दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला खाकीने केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दरोड्याच्या गुन्ह्यातील सहा वर्षापासून फरार असणा-या आरोपीसह वांबोरी घाटात वाहन चालकांना अडवून लुटमार करणारे आरोपी गजाआड केले आहे. सुरेश रणजित निकम, सतिष अरुण बर्डे, सागर शिवाजी जाधव या तिघांना पकडण्यात आले आहे.

यापूर्वीच विकास बाळू हनवत, करण नवनाथ शेलार व एक अल्पवयीन साथीदार यांना ताब्यात घेण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, २३ एप्रिल रोजी मित्रासह गोरक्षानाथ गड,मांजरसुंबा येथे दुचाकीवरुन वांबोरीफाटा मार्गे जात असतांना

गोरक्षनाथ गडाच्या चढावर ४ अज्ञात इसम दोन दुचाकीवरुन त्यांच्याजवळ येऊन त्याच्या मित्रास मारहाण करुन घजालानी व त्याचा मित्राजवळील ३ मोबाईल व सोने चांदीचे दागिणे असा एकूण १ कोटी १६ लाख ५ हजार रु. किमतीचा ऐवज बळजबरीने चोरुन नेला होता.

या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात रितीक प्रेमचंद छजलानी (वय २० वर्ष रा. पंचशीलनगर, भिंगार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यापूर्वी आरोपी विकास हनवत,

करण शेलार व एक अल्पवयीन साथीदार यांना ताब्यात घेवून एमआयडीसी पो.स्टे. ला हजर केलेले आहे. सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुरेश निकम हा फरार झालेला होता. पोलिसांना माहिती मिळाली आरोपी सुरेश निकम हा कात्रड येथे त्याचे घरी आला आहे.

त्यानुसार पोलीस पथकाने सुरेश रणजित निकम यास ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा यापूर्वी अटक करण्यात आलेले साथीदार तसेच सतिष बर्डे व सागर जाधव अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिली.

त्यावरुन पथकाने आरोपींचा शोध घेऊन आरोपी सतिष अरुण बर्डे, सागर शिवाजी जाधव यांना ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe