अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपाच्या पथकाकडून करावा केली जात आहे.
मात्र दुसरीकडे मनपा शेजारील माहिती सुविधा केंद्रातच नियमांचा फज्जा दळलेला दिसून येत आहे. महापालिकेने कठोर निर्बंध लागू केलेले असतानाच मंगळवारी जुन्या मनपा कार्यालयासमोरील माहिती सुविधा केंद्राबाहेर नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
महापालिकेच्या कार्यालयाबाहेर अशी गर्दी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महापालिकेकडून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची चाचणी करण्यात येत आहे.
मात्र महापालिकेच्या माहिती सुविधा केंद्रासमोरच लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी महापालिकेकडून कुठल्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. दरम्यान कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक सरकारी कार्यालये अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बंद ठेवण्यात आले होते.
नागरिकांना जन्म – मृत्यूच्या दाखल्यांची गरज आहे. हे दाखले घेण्यासाठी नागरिकांनी माहिती सुविधा केंद्राबाहेर गर्दी केली होती.
नियमांचे पालन न करता नागरिक गर्दी करत असून, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम