जुगाऱ्यांचा रंगलेला डाव पोलिसांनी उधळून लावला; भिंगारमधील घटना

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- भिंगारमधील घासगल्ली कमानीजवळ सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला.

या छाप्यात दोन लाख 77 हजार 150 रूपयांची रोख रक्कम, एक लाख 22 हजार 500 रूपयांचे मोबाईल असा तीन लाख 99 हजार 650 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाने हि कारवाई केली असून याप्रकरणी पोलीस नाईक भानुदास खेडकर यांनी फिर्याद दिली आहे. दाखल फिर्यादीवरून एकूण 29 जुगार्‍यांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्या जुगाऱ्यांची नावे…

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये विजय चांदमल मुनोत, गणेश बाबासाहेब टाक (दोघे रा. विनायकनगर, नगर), गणेश रामचंद्र रजपूत, योगेश मारूती सोनवणे, सिताराम र्बोदर्डे, शुभम राजू र्बोदर्डे, प्रकाश कृष्णा आढाव, नितीन अशोक क्षेत्रे, राहुल प्रकाश औटी,

राजू रामचंद्र रजपूत, अरूण रामचंद्र थोरात, सागर सिताराम साठे, संदीप मधुकर काळे, मुकेश नथुराम मनोदीया, अमित बाळासाहेब चिंतामणी, राकेश रोहिदास परदेशी, विजू अंबू भिंगारदिवे (सर्व रा. भिंगार),

अब्बास मेहबुबभाई शेख (रा. झेंडीगेट), कैलास सुधाकर क्षिरसागर (रा. पाथर्डी), हर्षद मनोज चावला (रा. मिस्किलनगर, सावेडी), सोफीयान रौफ कुरेशी (रा. फलटन चौकी, नगर),

युवराज भाऊसाहेब करंजुले (रा. फकीरवाडा, नगर), रामदास विश्वनाथ शिंदे (रा. माळीवाडा), मधुकर नाथाजी मोहिते (रा. कल्याण रोड, नगर), कैलास मनोहर दुधाळ (रा. चोंडेश्वरी ता. पाथर्डी),

अशोक जगन्नाथ जावळे, किरण भाऊसाहेब कणगरे (रा. सलबतपूर ता. नेवासा), सचिन वसंत काळे (रा. गिडेगाव ता. नेवासा), राजु श्रावण सकट (रा. केतकी, नगर) यांचा समावेश आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe