अन मुलींनीच दिला आपल्या आईला खांदा!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-  आपल्या परंपरेनुसार अंत्यविधी पुरुषांकडूनच केला जातो. मात्र आलमगीरधील या परंपेरला फाटा देत आईचे निधन झाल्यावर अंत्यसंस्कार पाणी पाजणे, खांदा देणे, अंत्यविधी आदी सर्व विधी महिलांनीच पार पाडले.

तसेच आईच्या स्मरणार्थ दहावा न करता स्नेहालयातील मुलांना एकवेळचे जेवण देऊन परंपरेला छेद देत पाचही महिलांनी क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.

जिल्हा रुग्णालयात परिचारिका असलेल्या अंजली उमाकांत शिडे यांच्या मातोश्री मंगल उमाकांत शिडे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुली व दोन भाच्या असा परिवार आहे.

वंदना, दुर्वा, कांचन, वृंदा व अंजली या पाचही मुली विवाहित आहेत. त्यांनीच आईचा अंत्यविधी केला. अंत्यविधीप्रसंगी जे काही विधी आहेत, ते मुलींनीच पार पाडले.

आईचा दफनविधी त्यांनी स्वामींच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला. एकाही विधीला या पाचही मुलींनी एकाही पुरुषाची मदत घेतली नाही. रुढी-परंपरेनुसार होणारा दिवसाचा कार्यक्रमही त्यांनी टाळला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe