‘त्याने’ डोळ्यादेखत शेळीचा पडला फडशा!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- बिबट्याने शेळीवर हल्ला करून उसाच्या शेतात ओढत नेऊन फस्त केल्याची घटना राहता तालुक्यातील बाभळेश्वर येथील खोबरे वस्तीवर घडली.

याबाबतची माहिती अशी की राहता तालुक्यातील बाभळेश्वर गावामधील शेतकरी दिलीप खोबरे यांची शेळी बिबट्याने रात्रीच्या वेळी हल्ला करून ओढत नेऊन ऊसाच्या शेतात फस्त केली असून

यामुळे बाभळेश्वर येथील खोबरे वस्ती येथे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe