अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-सोमवारी स्पॉट मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ नोंदविण्यात आली. आज १५ मार्च २०२१ रोजी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम ६१ रुपयांची वाढ नोंदवली गेलीय.
तर चांदीच्या किमतीही आज वाढल्यात. दिल्लीतील सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ४४,३६४ रुपये झाला. मागील सत्रात १० ग्रॅम सोन्याची किंमत ४४,३०३ रुपये होती.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/01/gold-price-1597748581.jpg)
त्याचप्रमाणे चांदीच्या दरात प्रति किलो १६२ रुपयांची वाढ करण्यात आली. यामुळे दिल्लीत चांदीचा दर प्रति किलो ६६,३३८ रुपये झाला. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६६,१७६ रुपये होता.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, “रुपया मजबूत होत असूनही दिल्लीत २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या स्पॉट किंमतीत प्रति १० ग्रॅम ६१ रुपयांची वाढ नोंदली गेली.
महाराष्ट्रातील सोने आणि चांदीचा भाव काय? :- महाराष्ट्रात सोने आणि चांदीच्या भावात घट झाली आहे. राज्यात २४ कॅरेट सोन्याच्या भावात ३० रुपये प्रति १० ग्रॅमने घट झाली आहे.
यामुळे सोन्याचा भाव ४४,८४० रुपये झाला. गेल्या सत्रात हा दर ४४,८७० रुपये इतका होता. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ४३,८४० रुपये प्रति झाला आहे. गेल्या सत्रात हा दर ४४,,८७० रुपये इतका होता.
तर यासोबतच चांदीच्या भावात ५०० रुपये प्रति किलोग्रॅमने वाढ झाली आहे. त्यामुळे ६६,९०० रुपये प्रति किलोग्रॅम असणारी चांदीची किंमत ६७,४०० रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. सोने खरेदीला भारतामध्ये मोठा वाव आहे.
सोन्याचा दर ५० हजारांच्या वरपर्यंत गेला होता. पण भारतीयांची सोने खरेदीबाबत एक मानसिकता आहे. त्यामुळे सोन्याचा दर ७० हजारांवर गेला तरी लोक सोनं खरेदी करतील.
त्यामुळे त्याचा सोने खरेदीवर फारसा फरक पडणार नाही. लोकं सोनं खरेदी करणं बंद करणार नाहीत”, असंही काही जाणकारांचं मत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|