अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- महागाईच्या युगात जमिनीचे भाव गगनाला भिडले आहे. आज छोटयाश्या भूखंडाला देखील लाखो रुपये मोजावे लागतात.
मात्र पूर्वीच्या काळात इनामी म्हणून हजरो एकर जमिनी दिल्या जात असत. अशीच एका हजारो एकर जमिनीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
ब्रिटिश कालखंडात १९०१ मध्ये पारनेर तालुक्यातील पळशी गावातील पळशीकर कुटुंबीयांच्या नावे जहागिरी वतन म्हणून २० हजार ५०१ एकर जमीन महसुली इनाम म्हणून दिली होती. त्यावरील जमीन महसूल गोळा करून तो सरकारला द्यावा लागत होता.
त्यातील एक हिस्सा संबंधित कुटुंबाला दिला जात होता. मात्र, स्वातंत्र्यानंतर इनाम रद्द झाले. त्यामुळे पळशीकर कुटुंबीयांनी त्यांच्याकडील सर्व जमीन सरकार जमा करायला हवी होती. मात्र, तसे न करता त्यांनी २० हजार एकर जमिनीची विल्हेवाट लावली.
काही जमिनीची विक्री केली, काही जमीन दान केली. इनामी जमीन कायदा रद्द केल्यामुळे पळशीकर कुटुंबीयांच्या नावे फक्त ५४ एकर जमीन होती. मात्र, या कुटुंबीयांनी सर्वच जमिनीची विक्री करून शासनाची फसवणूक केली.
या जमिनीवर कसत असलेल्या ७० गोरगरीब कुटुंबांना या जमिनीच्या मालकी हक्कापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे त्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर २० हजार एकर जमिनीच्या विक्रीची चौकशी व्हावी.
तसेच ती जमीन कुळांना मिळावी, यासाठी असाच लढा कायम राहील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी ॲड. प्रदीप ढाकणे, संदीप मोहिते, महादेव पठारे, सामाजिक कार्यकर्ते अर्शद शेख उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम