सरकारने 1000 एलएनजी पंप उघडण्याचे सुरु केले नियोजन ; तुम्हालाही पैसे कमवण्याची संधी , वाचा अन फायदा घ्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- भारतातील पेट्रोल पंपांप्रमाणेच एलएनजी स्टेशन तयार करण्याचे शासनाचे नियोजन सुरु झाले आहे. भारत सरकार या प्रकल्पासाठी 10,000 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयानेच ही माहिती दिली आहे.

लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) हा बसेस आणि ट्रकसारख्या लांब पल्ल्याच्या परिवहन सेवांसाठी चांगला इंधन पर्याय आहे.

एकदा एलएनजी टाकी भरली की ते 600 किमी ते 800 किमी पर्यंत आरामात प्रवास करू शकते. याशिवाय हे डिझेलपेक्षा 30 ते 40 टक्के स्वस्त आहे. देशातील वाहने सध्या इंधन म्हणून पेट्रोल आणि डिझेल व्यतिरिक्त सीएनजी किंवा ऑटो एलपीजी वापरत आहेत. सरकार आता एलएनजी स्थानक उघडण्याची तयारी करत आहे, त्यामुळे पेट्रोल पंपांसारखे एलएनजी पंप सुरू करूनही लोकांना पैसे मिळवण्याची मोठी संधी आहे.

50 एलएनजी पंप सुरू होईल –
देशात 50 एलएनजी पंप सुरू करून याची सुरूवात होईल. त्याचबरोबर, येत्या 3 वर्षात खासगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्रात सुमारे 1000 एलएनजी पंप उघडण्याची योजना आहे. सरकार या योजनेवर सुमारे 10,000 कोटी रुपये खर्च करेल. अशा परिस्थितीत लोकांना एलएनजी स्टेशन उघडण्याची संधी मिळेल.

आपण देखील एलएनजी पंप उघडण्यास इच्छुक असल्यास आपण पेट्रोलियम मंत्रालयाशिवाय पेट्रोनेट आणि इतर पेट्रोलियम कंपन्यांच्या वेबसाइटवर जाऊन पूर्ण माहिती मिळवू शकता.

 एलएनजी पंपची ही आहे योजना आहे –
केंद्र सरकार सुरुवातीला गोल्डन  क्वार्डिलैटरल महामार्गावर 50 एलएनजी पंप तयार करेल. गोल्डन  क्वार्डिलैटरल महामार्ग दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांना जोडतो. यानंतर, गोल्डन  क्वार्डिलैटरल आणि प्रमुख महामार्गांवर दर 200 किमी ते 300 किमी अंतरावर एलएनजी पंप उघडण्याची योजना तयार केली जात आहे.

 इंडियन ऑईल 20 एलएनजी पंप उघडेल –
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) प्रथम 50 एलएनजी स्थानकांपैकी 20  एलएनजी स्टेशंस उघडेल. त्यानंतर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) 11, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड 11 आणि गेल 6 एलएनजी पंप तयार करतील. उर्वरित 2 एलएनजी पंप पेट्रोनेट एलएनजी तयार करेल.

एलएनजीचा वापर 2015 मध्ये इंडियन ऑईल आणि टाटा मोटर्सद्वारे प्रथम इंधन म्हणून केला गेला. त्यानंतर  2016 मध्ये एलएनजी द्वारा चालणारी पहिली बस लॉन्च करण्यात आली. तेव्हापासून एलएनजीचा व्यावसायिक वापर सुरू झाला आहे.

 काय म्हटले आहे पेट्रोनेटने ?
पेट्रोनेट एलएनजीने एका निवेदनात म्हटले आहे की ते देशभरात एलएनजी पंप उघडण्याच्या योजनेवर काम करत आहेत. प्रमुख महामार्गालगत एलएनजी स्थानके उभारण्याची त्यांची योजना आहे.

या प्रकल्पात कोणतीही तेल विपणन कंपन्या (ओएमसी), सीजीडी संस्था किंवा इतर पक्ष भागीदार होण्यासाठी इच्छुक असल्यास ते अर्ज करू शकतात. आपण पेट्रोनेटचे पूर्ण निवेदन वाचू इच्छित असल्यास आपण खालील लिंकवर   क्लिक करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe