अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2 मार्च रोजी थकबाकीदारांची वीज तोडणार नाही,असे अधिवेशनात सांगितले होते.
मात्र बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या शेवटच्या दिवशी पुन्हा थकबाकीदार ग्राहकांची वीज तोडू,अशी माहिती p यांनी दिली.

या निर्णयामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 2 मार्च अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी भाजप आमदारांनी वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरून सभागृह दणाणून सोडलं होतं.
त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. फडणवीस यांनी नियम 57 अन्वये मुद्दा उपस्थित करत वीजबिलाच्या मुद्द्यावर तातडीने चर्चा करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली होती.
या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी प्रश्नोत्तराचा तास पुढे ढकलावा अशी मागणीही त्यांनी केली होती. यावर बोलताना जोपर्यंत विजेच्या विषयवार सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही.
तोपर्यंत राज्यातील घरघूती वीजग्राहक आणि शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली होती. कोरोनामुळे राज्यात 22 मार्च 2020 पासून लॉकडाऊन करण्यात आले होते.
त्यामुळे मार्च 2020 ते जून 2020 या कालावधीत कोव्हिडचे निर्बंध कडकपणे राबवण्यात आले. त्यामुळेया कालावधीतील वीजदेयके मागील तीन महिन्यांच्या सरासरीवरून देण्यात आले.
तसेच इतर वेगवेगळ्या सवलतीसुद्धा देण्यात आल्या. 2 मार्च रोजी थकबाकीदार ग्राहकांची वीजजोडणी तोडण्यासंदर्भात देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात येत आहे.”, असे नितीन राऊत म्हणाले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|