अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट हि अतिशय भयंकर पद्धतीने फैलावत गेली. या लाटेत अनेक कुटुंबची कुतंबे उद्धवस्त झाली. मुलांवरील आई – वडिलांचे छत्र हरपले.
मुले निराधार झाली. या संकटाने त्यांचे होत्याचे नव्हते करून टाकले. मात्र अशा निराधारांच्या मदतीसाठी टास्क फोर्स पुढे आले आहे. जिल्ह्यात करोनामुळे आतापर्यंत पालकांचा मृत्यू झालेल्या बालकांची संख्या 46 असल्याचे समोर आले आहे.
यात पाच बालकांचे आई आणि वडील दोघेही आणि 41 जणांचे एक तर आई अथवा वडील असे एका पालकाला करोनाने हिरवाले आहे. करोनामुळे पालकत्व हरवलेल्या बालकांच्या मदतीसाठी टास्क फोर्स स्थापन केला आहे.
या फोर्सकडून करोनामुळे पालकांचे छायाछत्र हरपलेल्या बालकांची काळजी व संरक्षणाची तयारी सुरू करण्यात आली आहे. वरील दोन्ही प्रकारातील बालकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांमधून लाभ देण्यात येणार असल्याचे महिला व बालकल्याण विभागाकडून सांगण्यात आले.
दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना केंद्र सरकारच्या योजनेतून सहाय करण्यात येणार आहे. तर एक पालक गमावलेल्या बालकांच्या बालसंगोपणाची जबाबदारी राज्य सरकारच्या योजनेतून करण्यात येणार आहे.
यास ज्या पालकांना आपल्या बालकांचे पालन करण्यात अडचण येत असले, अशा बालकांना बालगृहाची व्यवस्था करण्यात येणार असून त्यांच्या 18 वर्षापर्यंतच्या शिक्षणाची जबावदारी राज्य सरकार घेणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम