गाळे लिलावाच्या माध्यमातून ग्रामपंचायत बनली कोट्याधीश

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- 10 गाळ्यांच्या लिलावाच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील वांबोरी गावातील ग्रामपंचायतीला 1 कोटी 65 लाख 11 हजार रुपये मिळाले आहे. दरम्यान ग्रामपंचायत मालकीच्या एकूण 10 गाळ्यांची लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे.

गेल्या 2 वर्षापूर्वी ज्येष्ठ नेते सुभाष पाटील व डॉ. तनपुरे सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनखाली या शॉपिंग सेंटरचे बांधकाम तत्कालीन सदस्य मंडळाने केले होते.

वांबोरी ग्रामपंचायत समोर बांधण्यात आलेले गाळे जिल्हा परिषद सदस्या सौ. शशिकलाताई पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा ग्रामीण विकास निधी अंतर्गत ४५ लाख रुपये कर्ज उपलब्ध करण्यात आले.

तर ग्रामपंचायत फंडातून सत्तावीस लाख रुपये उपलब्ध करून हे गाळे बांधण्यात आले आहेत. दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयासमोर मुख्यचौकात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष स्व.रामनाथ वाघ शॉपिंग सेंटरमधील एकूण 10 गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेत स्थानिक रहिवासी असलेल्या

एकूण 74 ग्रामस्थांनी गाळा खरेदीसाठी प्रत्येकी 25 हजार रुपयांची अनामत रक्कम भरून सहभाग घेतला. यावेळी सर्वाधिक 19 लाख 50 हजार रुपये बोली ठरली.

तर सर्वात कमी 14 लाख 51 हजार रुपये बोली ठरली. एकूण 10 गळ्याच्या या लिलाव प्रक्रियांमध्ये ग्रामपंचायतीला 1 कोटी 65 लाख 11 हजार रुपये मिळाले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe