अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- गावागावात होणाऱ्या चोऱ्या- दरोडा तसेच मारामारी अशा घटनांना आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन गावात तसेच चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असे आवाहन कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले असून
जी ग्रामपंचायत लवकरात लवकर व चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवेल त्यांचा निश्चितच कर्जत पोलिसांतर्फे गौरव करण्यात असे यादव यांनी म्हंटले आहे.
सर्वच ठिकाणी चोरी, जबरी चोरी, दरोडा तसेच मारामारी महिलांविषयीचे गुन्हे घडत असतात. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
त्या अनुषंगाने आपल्या गावात येणारे सर्व रस्ते व चौक या ठिकाणी चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालता येईल. तसेच गुन्हे घडल्यास आरोपीचा शोध घेण्यास मदत होणार आहे.
आपल्या ग्रामपंचायत कडे असलेला निधी सदर कामी वापरू शकता. याबाबत आम्ही गट विकास अधिकारी कर्जत यांना पत्रव्यवहार करून आपणास कळविण्यात बाबत विनंती केली होती. त्याबाबत त्यांच्या कार्यातून आपणास पत्र देण्यात आले आहे.
तरी सीसीटीव्ही बसवण्यासाठी प्राधान्य देऊन योग्य ती कार्यवाही करावी. सदर बाबत आवश्यकता असल्यास आपण गावामध्ये मीटिंग घेऊ सदर कामासाठी आपण ग्रामपंचायत निधी,
प्रतिष्ठित दानशूर व्यक्ती यांच्याकडून निधी उभारून करू शकता असे पोलीस निरीक्षक यादव यांनी जी ग्रामपंचायत लवकरात लवकर व चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहे. त्यांचा निश्चितच कर्जत पोलिसांतर्फे गौरव करण्यात येईल असेही त्यांनी म्हंटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम