अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- माहेरून ५० हजार रुपये आणावे यासाठी विवाहितेला छळ हाेत हाेता. यातून तिने आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील धारणगावमध्ये गुरुवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी मृत विवाहितेच्या नवऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
न्यायालयाने या चौघांना सोमवार १२ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे अशी माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, राणी किरण चंदनशिव (१९ ) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
ती धारणगाव राहत होती. वडिलांनी लग्नात पन्नास हजाराचा हुंडा दिला नाही, लग्न चांगले केले नाही म्हणून राणीला तिचा नवरा, सासरा, सासू व दिर माहेरून ५० हजार रुपये आणावे यासाठी त्रास देत व मानसिक छळ करत होते.
हा छळ असह्य झाल्यामुळे ती आजारी पडली , गुरुवारी दुपारी १२ वाजता गोदावरी नदी पात्रात संशयास्पद मृत्यू झाला. दत्तात्रय साठे (मढी बुद्रुक ता. कोपरगाव)
यांच्या फिर्यादीवरून तिचा नवरा किरण चंदनशिव , सासरा साहेबराव चंदनशिव, सासू विठाबाई उर्फ मंदा चंदनशिव, लक्ष्मण चंदनशिव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम