अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढते असून जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे, रेमडेसिव्हिर इंजेक्शन, बेड, व ऑक्सिजन ची कमी ह्या समस्या सध्या भेडसावत आहेत.
याबाबत खासदार सुजय विखे यांनी भाष्य केले आहे, मुंबईत दोन लाख रेमडेसिव्हिर इंजेक्शन आलेत.
जिल्ह्यातील तीनही मंत्री त्यातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला किमान पाचशे इंजेक्शन का देऊ शकत नाहीत? बैठका आणि फोटोसेशन करून कोविडचे नियंत्रण होणार नाही.
ऑक्सिजनचा तुटवडा आहे. कुणाचाच कुणाला मेळ नाही. पालकमंत्र्यांनी कोविड काळात नगर जिल्हा बोर्डिंगमध्ये टाकला, सवड झाली की भेटायला येतात, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|