लसीच्या पुरवठ्याच्या अडथळ्याविषयी पालकमंत्री म्हणाले…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  सरकारच्या कोणत्याही योजनेचा उद्देश चांगला असला, तरी तो यशस्वी होण्यासाठी अंमलबजावणी करणारी बळकट यंत्रणा आवश्यक असते. सध्या सुरू झालेल्या लसीकरणामध्येही सुलभ तंत्रज्ञानाअभावी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

केंद्र सरकारकडून राज्याला लस मिळण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पाहिजे तितक्या वेगाने लसीकरण मोहीम राबविता येत नाही. प्राप्त लसीचे योग्य नियोजन करुन शक्य तितक्या वेगाने लसीकरण करण्याबाबत प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत.

अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यावेळी पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात ९ लाख ९५ हजार ५८९ व्यक्तींनी लसीची मात्रा घेतली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यासाठी कोविशिल्डचे ८ लाख १९ हजार २७० आणि कोवॅक्सिनचे १ लाख ९० हजार २६० असे एकूण १० लाख ९ हजार ५३० डोस प्राप्त झाले होते.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या अनुषंगाने आरोग्यविषयक सुविधांच्या बळकटीकरणासोबतच पुरेशा ऑक्सिजन निर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे.

दरम्यान जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती, लसीकरण आणि पीक पाण्याचा आढावा पालकमंत्री मुश्रीफ यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना या बैठकीची माहिती दिली.

यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले कि, जिल्ह्यात सध्या कोरोनाची रुग्णसंख्या घटत आहे. दुसरी लाट ओसरत चालली असली तरी ग्रामीण भागात काही ठिकाणी रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

अधिकाधिक आरटीपीसीआर चाचण्या घेणे आणि बाधितांना शोधून संपर्क साखळी तोडणे महत्त्वाचे आहे. पीक पेरणीचा आढावाही बैठकीत घेण्यात आला.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येणार नाही आणि पुरेसा पाऊस पडेल, अशी आशा करु या. पाऊस आठवडाभर लांबला तर मूग आणि उडदाची दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News