निसर्गाचा कहर..! वादळाने पत्रे उडून भिंतीला गेले ‘तडे’..!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- दोन दिवसापासून जिल्ह्यातील विविध ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.

मात्र त्याच बरोबर या पावसाने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले आहे. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे वादळी वा-यामुळे कन्या विद्यालयाच्या स्वयंपाकगृह व धान्य कोठीचे ४५ पत्रे उडून पडल्याने ते पुर्णपणे खराब झाले आहेत.

जोराचा धक्का बसल्याने भिंतींना मोठ्या तडे पडल्याने स्वयंपाकगृह बांधकामाचे पुर्णपणे नुकसान झाले आहे. जुन्या स्वयंपाकगृहाचे  काही पत्रे  उडून नवीन स्वयंपाकगृहावर पडल्याने त्याचेही नुकसान झाले आहे.

धान्य कोठीतील धान्य भिजून खराब झाले आहे. कोरोनामुळे शाळा व वस्तीगृह सुरू नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या वादळामुळे टाकळी ढोकेश्वर गावातील अनेक लहानमोठी झाडे उन्मळून पडली आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News