जिल्ह्यातील ‘हे’ धरण 100 टक्के भरण्याच्या उंबरठ्यावर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांमध्ये नगर जिल्ह्यातील काही भागांमध्ये समाधानकारक पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे.

दरम्यान यातच जिल्ह्यासाठी एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले भंडारदरा धरण 11039 दलघफू क्षमतेचे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे.

त्या पाठोपाठ आता येत्या दोन दिवसात निळवंडे धरणही आज 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. सोमवारी सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 8270 दलघफू (99.31) पाणीसाठा होता.

गत आठवड्यात भंडारदरा पाणलोटात धो-धो पाऊस झाला. त्यामुळे हे धरण ओव्हरफ्लो झाले. त्यानंतर निळवंडेत जोरदार आवक होत होती. हे धरण 94 टक्के भरले.

पण पाऊस सुरू असल्याने या धरणातील पाणीपातळी कायम ठेऊन निळवंडेतून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर पाऊस कमी झाला.

पण भंडारदरातून विद्युत गृह क्रमांक एक मधून 816 क्युसेक व वाकीचा ओव्हरफ्लो 98 क्युसेक पाणी निळवंडेत जमा होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe