अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :- अकोले तालुक्यातील शेती व्यवसाय करणारा एक पुरुष सोशल मीडियाच्या माध्यमातून हनीट्रॅप करणाऱ्या दोन महिलांच्या जाळ्यात अडकला. त्याला ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात ओढून शरीर संबंधाचा अश्लील व्हिडिओ बनविला.
आणि बदनामीची धमकी देत त्याच्याकडून दोन लाखाची खंडणी मागितल्याच्या प्रकार समोर आला आहे. या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेल्या व्यक्तीने अकोले पोलिसांत तक्रार दिल्याने या महिलेचे बिंग फुटले.
या गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणाची तालुक्यात चांगलीच चर्चा सध्या सुरु आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, ११ जून रोजी सदर व्यक्तीला आरोपींनी त्यांच्या संगमनेर येथील फ्लॅटवर बोलाविले.
तेथे त्यास धमकी देऊन जबरदस्तीने शरीर संबंध करण्यास भाग पाडले. यावेळी उर्वरित दोघा आरोपींनी त्याचा अश्लील व्हिडिओ बनवून त्यास दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. पीडित व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा आरोपींनी त्यास मारहाण करत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
त्यानंतर आरोपींना त्याने एटीएममधून काढून ३० हजार रुपये दिले. आरोपींनी उर्वरित १ लाख ७० हजार रुपयांसाठी त्या व्यक्तीकडे तगादा लावला होता. आरोपींचा त्रास असह्य झाल्याने शेवटी पीडित पुरुषाने पोलिसांत धाव घेत घटनाक्रम सांगितला. त्यानंतर पोलिसांना सापळा रचून तिघा आरोपींना जेरबंद केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम