अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने विमानाने मुंबईतील कोकीळाबेन रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
साध्वी प्रज्ञासिंह यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं.दरम्यान साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते,
मात्र आता त्यांना मुंबईतील कोकिळा बेन रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. प्रज्ञा सिंह मागील अनेक दिवसांपासून बऱ्याच आजारांनी त्रस्त आहेत.
त्यातच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. शुक्रवारी सायंकाळी त्यांचा रक्तदाब अचानक वाढला. अनेक प्रयत्न करुनही रक्तदाब कमी झाला नाही.
त्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. चार्टर्ड प्लेनने त्यांना मुंबईत आणण्यात आलं. डिसेंबरमध्ये कोरोना संसर्गानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
कोण आहे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर? :- जाणून घ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी आरोप असून त्यांच्यावर मोक्कांतर्गत अटकेची कारवाई करण्यात आली होती, कालांतराने एनआयएकडून तो हटवण्यात आला त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली.
दरम्यान, त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्विकारत २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली आणि त्या निवडणूनही आल्या. या निवडणुकीत त्यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्वीजय सिंह यांचा पराभव केला.
दरम्यान, मधल्या काळात प्रज्ञासिंह यांनी महात्मा गांधीचा मारेकरी गोडसेच्या समर्थनार्थ वादग्रस्त विधान केलं होतं, त्यावेळी त्या चर्चेत आल्या होत्या. याविधानावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना समज दिली होती.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|