अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय.
राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे खबरदारी म्हणून राज्यात नाईट कर्फ्यु लावण्यात आला आहे
दरम्यान राज्यात नागपुरातील वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येसोबतच कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे.
महाराष्ट्रात सध्याच्या घडीला सर्वात जास्त कोरोना रुग्णांचे मृत्यू हे नागपूर जिल्ह्यात होत आहेत. गेल्या ३ दिवसांपासून नागपुरात दररोज कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा हा ५० वर आहे.
३ दिवसांत नागपूरमध्ये १६७ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. एकीककडे नव्या रुग्णांची संख्या ही सातत्याने ३ हजाराच्या घरात आहे, तर मृत्यूचे प्रमाणही ५०च्या घरात आहे. नागपूरपाठोपाठ पुण्यातही परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे.
एकीकडे नागपुरात ५०च्या जवळ दररोज कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत, तर तेच पुण्यात ३०च्या आसपास कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण आहे. पुण्यातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट २२ टक्क्यांवर गेला आहे,
तर मृत्यूदर २ टक्क्यावर आला आहे. गर्दीच्या महानगरांसोबतच लहान शहरं आणि जिल्ह्यांमध्येही कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनाचे आकडे पुन्हा वाढत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर आरोग्य प्रशासन आता खडबडून जागं झालं आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याबाबत बैठकांचं सत्र सर्वच ठिकाणी सुरू झाल्याचं सध्या चित्र आहे
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|