अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar Crime :- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारातील आवळा पॅलेस हे हॉटेल चोरट्यांनी फोडले. रोख रक्कम आणि एक मोबाईल असा आठ हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौकातील मुख्य प्रवेशद्वारात आवळा पॅलेस नावाचे हॉटेल आहे. ज्ञानेश राजेंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी रात्री हॉटेल बंद केले होते.

चोरट्यांनी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास हॉटेलचा पाठीमागील दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यातील विविध रक्कमेच्या चलनी नोटा आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा आठ हजार रूपयांचा ऐवज चोरला.
ज्ञानेश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.