ऊस तोडणी कामगारांच्या झोपड्या आगीत जाळून खाक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- ऊस तोडणी कामगारांच्या अड्ड्यातील तीन झोपड्यांना अचानक आग लागल्याची घटना संगमनेर तालुक्यातील समनापूर शिवारात घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील समनापूर परिसरातील घुलेवाडी रोडवर ऊस तोडणी कामगारांचा मोठा अड्डा आहे. या अड्ड्यात ३० ते ४० झोपड्या आहेत.

ऊस तोडणी कामगार सकाळी ऊस तोडण्यासाठी गेले असता काल दुपारी 3 वाजेच्या सुमारास या अड्ड्यातील काही झोपड्यांना अचानक आग लागली.या आगीत संसारोपयोगी साहित्य, कपडे, पैसे आदी जळून खाक झाले.

आग लागल्याची माहिती थोरात कारखान्याला दिली. आगीची माहिती मिळताच कारखान्याचे अग्निशामक बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

स्थानिक नागरिक व अग्नीशमक जवानांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवीत हानी झाली नाही. कामगार तलाठी निलेश लंके यांनी जळिताचा पंचनामा केला. जळितात नुकसान झालेल्या ऊस तोडणी कामगारांना तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी होत आहे

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe