सुशिक्षित डॉक्टरचा अशिक्षितपणा…पत्नीवर केला जादूटोणा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील राहुरी येथील येवले आखाड्यावरील 27 वर्षांच्या नवविवाहित महिलेचा छळ करून तिच्यावर जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

महिलेच्या फिर्यादीवरून महिलेचा पती. मांत्रिकांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून श्रीरामपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. विशेषबाब म्हणजे सुशिक्षित डॉक्टरकडून हा प्रकार करण्यात आला असल्याचे समोर आले आहे.

डॉ. विकास विश्वनाथ लवांडे (पती), विश्वनाथ रखमाजी लवांडे (सासरे), पूनम विश्वनाथ लवांडे (नणंद, तिघेही रा. कारेगाव, ता. श्रीरामपूर), किशोर सीताराम दौड (मामेसासरे), प्रमिला किशोर दौड (मामेसासू, दोघेही रा. मातापूर, ता. श्रीरामपूर) व जादूटोणा करणारा एक मांत्रिक (नाव समजले नाही) अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अश्विनी विकास लवांडे (हल्ली रा. येवले आखाडा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की, डॉ. विकास लवांडे यांच्याशी १२ फेब्रुवारी २०२० रोजी विवाह झाला. कारेगाव येथे सासरी नांदत असताना सासूचे अचानक ब्रेन हॅमरेजने निधन झाले.

त्यामुळे अपशकुनी, पांढऱ्या पायाची असल्याचा आरोप करून सासरच्या मंडळींनी छळ सुरू केला. एका मांत्रिकाला बोलावून माझ्यावर काळ्या जादूचे प्रयोग केले. डोक्यावर लिंबू कापून, डोक्याचे केस उपटून, अंगावरील कपडे कापून ते काळ्या बाहुलीला चिकटवणे, असे अघोरी प्रकार करण्यात आले.

मांत्रिकाद्वारे उपचार केले नाहीत तर घरात वाईट प्रकार घडतील, अशी धमकी देण्यात आली. दोन दिवसांपूर्वी वडिलांनी माझ्याकडे काळी बाहुली,

लिंबू व तावीज, अशा वस्तू पाहिल्यावर त्यांना सर्व प्रकार सांगितला. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी महेश धनवटे (रा. राहुरी) यांना माहिती दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!