अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-नजीकच्या काळात जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेत कोरोना संसर्ग रोखण्याकामी जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भोसले यांनी नियोजनाची पूर्व दक्षता घेत प्रशासकिय अधिकाऱ्यांकडे मुद्देनिहाय जबाबदारी निश्चित केली आहे.
प्राप्त अधिकारानुसार याबाबतचे रितसर आदेश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जारी केले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांनी दिली.
मिशन बिगीन अंतर्गत येत्या दि. ३१ पर्यंतच्या कालावधीसाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व सूचनांचे आदेश जिल्हाधिकारी यांनी यापूर्वीच जारी केले आहेत.
दरम्यान जिल्ह्यात कोरोना बाधितांची घटलेली संख्या पुन्हा वाढू लागल्याचे मागील काही दिवसांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यात संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेत जिल्हाधिकारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सतर्कतेने प्रशासन यंत्रणांना मोहिमशीर केले आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी विविध प्रशासकिय अधिकाऱ्यांकडे मुद्देनिहाय जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक,
जिल्हा आरोग्य अधिकारी, मनपाचे वैद्यकिय अधिकारी, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा नियोजन अधिकारी, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी,
जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत व एकात्मिक बाल विकास प्रकल्प), सर्व प्रांताधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, सर्व पोलिस निरीक्षक,
सर्व वैद्यकिय अधिक्षक, सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि सर्व नगर परिषद / नगरपंचायत मुख्याधिकारी यांचा यात समावेश आहे. जबाबदारीच्या अनुषंगाने कार्यवाही करावी.
अधिनस्त मनुष्यबळाचा वापर करीत सोपवलेली जबाबदारी पार पाडावी व अहवाल सादर करावा, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|