अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- अकोले तालुक्यातील कुंभेफळ येथील प्रियकराला तरुणीने ‘तू चांगला वागत नाहीस म्हणून रिलेशनशीप पुढे चालू ठेवण्यास नकार दिला.
यावरून चिडलेल्या प्रियकराने मोबाइलने शुट केलेले अश्लील व्हिडोओ क्लीप तिच्या ओळखीच्या लोकांना व्हायरल केले. तकचे विवस्त्र अवस्थेतील असंख्य फोटो प्रेयसीच्या गारवाडी गावांतून सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर टाकून बदनामी केली.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2020/09/Mahaupdate-Arrest-6.jpg)
या गुन्ह्यात अटक आरोपी चंद्रशेखर आनंदा कोटकर (वय २८, रा. कुंभफळ) यास गुरुवारी (२२ एप्रिल) संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाकडून आरोपीस सोमवापर्यंत (२६ एप्रिल) पोलिस कोठडी देण्यात आली.
रामनवमीच्या दिवशी गारवाडी गावातून सकाळीच उघडकीस आलेल्या या घटनेनंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. आरोपी चंद्रशेखर आनंदा कोटकर हा व पीडिता संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील कृषी महाविद्यालयात एकत्रित शिक्षण घेतले.
तेव्हा त्यांची ओळख झाल्यावर या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. मालदाड येथील शिक्षण पूर्ण झाल्यावर नारायणगाव (ता. जुन्नर) येथील एका कृषीविषयक खासगी कंपनीत तो नोकरीस लागला.
यानंतरही त्यांच्यातील रिलेशनशीप सुरूच राहिले. मात्र, त्यानंतर प्रियकर चंद्रशेखर हा प्रेयसीबरोबर चुकीचे वागूू लागल्याच्या कारणावरून पुढे रिलेशनशीप सुरू ठेवण्यास तिने नकार दिला.
यामुळे चिडून त्याने शुक्रवारी (१६ एप्रिल) रात्री ८.३० वाजता व बुधवारी (२१ एप्रिल) सकाळी त्याच्या मोबाइलने तिच्या अश्लील व्हिडोओ क्लीप व्हायरल केल्या.
विवस्त्र अवस्थेतील सुमारे फोटो गारवाडी गावात वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर व गावातीलच मंदिर परिसरात हेतूपुरस्सर टाकून तिची बदनामी केली.
या संदर्भात अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास डीवायएसपी राहुल मदने यांच्याकडे असून त्यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस निरीक्षक अभय परमार करीत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|