मुळा धरणात पाण्याची आवक मंदावली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- राहुरी | घाटमाथ्यावर पाऊस मंदावल्याने कोतूळकडून मुळा धरणात येणारी पाण्याची आवक घटली.

सोमवारी सकाळी कोतूळकडून मुळा धरणात ९७७ क्युसेकने तर सायंकाळी ६ वाजता ८८६ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. सोमवारी १२ तासांत मुळा धरणात अवघे २२ दशलक्ष घनफूट पाण्याची वाढ झाली.

सोमवारी सायंकाळी ६ वाजता मुळा धरणाचा पाणीसाठा १७ हजार ५३५ दशलक्ष घनफूट झाल्याने धरणाचा पाणीसाठा ६७.४० टक्के झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe