रेमडेसिविरच्या काळ्याबाजारात आता चक्क महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा सहभाग ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-जिल्ह्यासह शहरात कोरोना रुग्णांना महत्वाचे असणार्या रेमडेसिविरचा काळाबाजार सुरू असून त्याची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत.

असे असताना आज यात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय. या काळ्याबाजारात आता चक्क महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा आरोप झाल्याने

प्राप्त तक्रारीवरुन कोतवाली पोलिसांनी रात्री उशिरा वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांच्या कार्यालयात काही रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. शिवसेनेच्या एका नेत्याने ही तक्रार केल्याचे समजते.

तथापि पोलीस पथक पोहोचण्यापूर्वी तेथील साठा हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान बोरगे यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने शहरातील बलदोटा यांच्या एका दुकानातून पाच रेमडेसिविर इंजेक्शन आणले होते,

अशीीमाहिती दिली. ते इंजेक्शन तिथे होते, अशी पुष्टी देण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. प्रशासनाने दिलेल्या मंजुरीनुसार हे इंजेक्शन केडगाव येथील एका हॉस्पिटलसाठी घेण्यात आल्याचा दावाही संबंधित कर्मचाऱ्यांने केला आहे.

मात्र, प्रशासनाचे तसे आदेशपत्र तो दाखवू शकला नव्हता. परंतु, या कर्मचार्‍याला ही इंजेक्शन मिळालीच कशी? असाही प्रश्न अजून सुटलेला नाही.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe