अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे जि.प. माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पा.यांनी देवकृपा प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्व.मा.आ.वसंतराव झावरे पाटील ३०० बेडचे कोविड
सेंटर टाकळी ढोकेश्वर येथे केले असून, या ठिकाणी सर्व गरजू कोरोना रुग्णांना मोफत औषधउपचार व इतर सुविधा येथे पुरविल्या जात आहेत.
तसेच कोविड सेंटरमधील दाखल अत्यवस्थ रुग्णांसाठी अहमदनगर शहरात अनेक प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये बेड आरक्षित केले आहेत जेणेकरून आकस्मिक परिस्थितीत रूग्णांची परवड होणार नाही.
या कोविड सेंटरसाठी कोणतीही मागणी न करता दानशूर मंडळी सढळ हाताने रोख स्वरूपात तसेच वस्तुरुपाने मदत करीत आहेत.
कोरोना संकटात पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य लोकांसाठी हे कोविड सेंटर निश्चितपणे दिलासादायक आहे. या कोविड सेंटरमध्ये सध्या जवळपास १०० रुग्ण उपचार घेत आहेत.
येथे असलेले आल्हाददायक वातावरणात रूग्णांसाठी लाभदायक आहे. सुजितराव झावरे पा. स्वत: कोविड सेंटरमध्ये उपस्थित राहुन रूग्णांच्या समस्या जाणून घेत त्यांना सर्वोतोपरी मदत करीत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|