अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-राज्यात मंगळवारी ६०,२१२ नवे रुग्ण आढळले आहेत. नव्या रुग्ण वाढीसोबतच राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ३५ लाख १९ हजार २०८ झाली आहे.
दिवसभरात ३१ हजार ६२४ रुग्ण बरे झाले. यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २८ लाख ६६ हजार ९७ इतकी झाली आहे. दिवसभरात २८१ रुग्णांचा मृत्यू झाला असून यामुळे राज्यातील एकूण बळींची संख्या ५८,५२६ वर पोहोचली असून
सध्या ५ लाख ९३ हजार ४२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात नोंद झालेल्या २८१ बळींमध्ये मुंबई २७, कल्याण डोंबिवली ९, उल्हासनगर २, मीरा-भाईंदर २, वसई विरार१, रायगड ३, नाशिक १६, अहमदनगर १७, धुळे २, जळगाव ८, नंदुरबार १५, पुणे १६, पिंपरी चिंचवड १, सोलापूर ६,
सातारा ९, कोल्हापूर ५, सांगली ५, सिंधुदुर्ग २, औरंगाबाद १०, जालना १३, परभणी ५, लातूर २, उस्मानाबाद ४, बीड १०, नांदेड २१, अकोला ९, अमरावती ६,यवतमाळ ३, बुलढाणा ५, वाशिम १, वर्धा ४, गोंदिया ३, चंद्रपूर ६ आणि नागपूर येथील ३० जणांचा समावेश आहे.
एकट्या मुंबई शहरातील बाधित रुग्णांची संख्या ५, ३५, २६४ असून त्यापैकी ४ लाख ३५ हजार ९५३ रुग्ण बरे झाले आहेत. तर येथील मृतांचा एकूण आकडा १२,०९३ इतका आहे. राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.४४ टक्के आहे.
तर राज्यातील मृत्यूदर १.६६ टक्के आहे. सध्या राज्यात ३२, ९४,३९८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३०,३९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत २,२५,६०,०५१ नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले असून १५.६ टक्के रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|