अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- शहरातील काटवन खंडोबा व गाझी नगर भागातील लाईट रविवारी रात्री पासून गेलेली असल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले.
रविवारी संध्याकाळी गेलेली लाईट तब्बल 36 तासानंतर मंगळवारी सकाळ पर्यंत आलेली नव्हती. विद्युत महावितरणच्या कर्मचार्यांना संपर्क साधला असता डिपी जळाल्याने लाईट गेली असून, डिपीची दुरुस्ती झाल्यानंतर लाईट येणार असल्याचे सांगण्यात आले.
शहरातील काटवन खंडोबा व गाझी नगर भागात छत्तीस तासपेक्षा जास्त वेळ लाईट गेली असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
वारंवार या भागात पाऊस किंवा जोरदार वारे आल्याने लाईट जात असते. तर सिंगल लाईन ची लाईट जाण्याचा प्रकार नेहमीच सुरु असतो.
लाईट बील वेळेवर भरुन देखील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम