अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे जिल्ह्यात टप्प्या टप्प्याने लॉकडाऊन करण्यात आले होते.
यामुळे अनेकांचा रोजगार गेला. याच काळात जिल्ह्यात गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणावर वाढू लागली. यातच बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्याने अनेकांजन गुन्हेगारीकडे वळू लागल्याचे देखील घटना घडल्या.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/03/0Crime_6_97.jpg)
गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक व सराईत चोरट्या गुन्हेगारांमुळे नगर जिल्ह्यातील चोरी आणि लुटमारीच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ झालेली दिसत आहे.
आता कोरोना सोबतच जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे काम देखील प्रशासनाला करावे लागणार आहे.
नुकतेच श्रीरामपूर शहरात एका घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी घरातील तब्बल 30 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
याबाबत फिर्यादी सुशील सखाराम कदम (रा.सूतगिरणी, दत्तनगर, श्रीरामपूर) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक श्री.पवार हे करीत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|