अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-नगर महानगरपालिकेचा वरिष्ठ अधिकार्यांच्या गलथान कारभारामुळे मनपा रक्तपेढीतील लाखो रुपयाचे प्लाझ्मा निर्मिती मशीन धूळखात पडून आहे.
हे मशीन लवकरात-लवकर सुरू करण्यासाठी मनपा आरोग्य समितीच्या वतीने पुढाकार घेतला आहे. यामुळे लवकरच हे मशीन सुरू होणार आहे.
दरम्यान, आ.संग्राम जगताप यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मनपाच्या रक्तपेढीसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मशीन खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून दिला होता.
यावेळी सदस्य निखिल वारे म्हणाले, शासन नागरिकांच्या आरोग्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असून मनपातील अधिकार्यांच्या निष्काळजीपणा व दुर्लक्षामुळे गेल्या दोन वर्षापासून सिटीस्कॅन मशिन जागेअभावी धूळ खात पडून आहे.
करोनाच्या संकट काळामध्ये शहरातील करोना रुग्णांना चाचणीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. परंतु हेच महापालिकेच्या सिटीस्कॅन मशिन चालू असते तर हा खर्च वाचला असता.
दुसरीकडे मनपा आरोग्य अधिकार्यांच्या गलथान कारभारामुळे प्लाझ्मा निर्मितीचे मशीन पॅथॉलॉजिस्ट अभावी गेल्या दोन वर्षभरापासून धूळ खात पडून आहे.
हे मशीन सुरु असते रुग्णांचे जीव वाचवण्याबरोबरच आर्थिक दुर्बल घटकांना माफक दरात किंवा विनामूल्य आरोग्य सेवा देता आली असती.
देर आये दुरुस्त आये…हि म्हण आता सार्थक ठरत आहे. उशिरा का होईना प्रशासनाला जाग आली असून आता हे धूळखात पडलेली मशीन लवकरच रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम