अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- राहाता येथील एका 32 वर्षीय विवाहित महिला आपल्या दोन मुलांसह घरीही काहीही न सांगता निघून गेली आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीने राहाता पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, राहाता येथील खंडोबा चौकातील आनंद उत्तमराव बारसे यांनी राहाता पोलिसांना दिलेल्या
खबरीवरून त्यांची पत्नी सारिका आनंद बारसे (वय 32) हिच्यासह आलोक आनंद बारसे (वय 15), कार्तिक आनंद बारसे (वय 13) हे तिघे काहीही एक न सांगता राहात्या घरातून कुठेतरी निघून गेली.
त्यांना नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही, अशा स्वरुपाची खबर राहाता पोलिसांकडे दिली आहे.
याप्रकरणी राहाता पोलिसांनी हरवल्याची नोंद केली आहे. या बेपत्ता प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेंबल दिलीप तुपे हे करत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम