अजित पवार व गायकर यांच्यात मॅच फिक्‍सिंग झाले होते

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक सीताराम गायकर यांनी नुकताच पक्षांतर केले आहे. यामुळे त्यांच्यावर नाराज कार्यकर्त्यांकडून नाराजीचा सुरु बाहेर येत आहे.

त्याचबरोबर आता त्यांच्यावर टीका देखील होत आहे. यातच गायर यांच्यावर भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी जहरी टीका केली आहे जिल्हा बॅंकेतील गैरव्यवहार वाचविण्यासाठी गायकर राष्ट्रवादीत गेले आहेत.

जिल्हा बॅंक नोकरभरती, फर्निचर खरेदी व्यवहारात मोठा गैरव्यवहार झाला आहे. तो लपविण्यासाठी अजित पवार यांच्या पदराआड लपण्याची वेळ गायकर यांच्यावर आल्याची टीका सीताराम भांगरे यांनी केली.

भांगरे म्हणाले, की गायकर हे संधीसाधू असून, विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व गायकर यांच्यात मॅच फिक्‍सिंग झाले होते. त्यामुळे कुंपणानेच शेत खाल्ले.

ज्यांच्या विश्वासावर माजी मंत्री मधुकर पिचड यांनी विधानसभा निवडणुकीचे सूत्रे दिली, त्यांनीच पिचड यांच्या पाठीत खंजीर खुपसला. असे प्रतिपादन भांगरे यांनी केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe