व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सकारात्मकता दर्शवली

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- टाकळीभान येथील कमानीपासून घोगरगाव रस्त्याच्या दुतर्फा व्यवसायिकांनी रस्त्याच्या कडेला केलेले अतिक्रमण समोपचाराने काढण्यास व्यापाऱ्यांनी साकारत्मकता दर्शविली आहे.

दरम्यान उद्यापासून सार्वजनिक बांधकाम विभाग अतिक्रमण हटवण्यासाठी धडक मोहीम राबवणार होते. टाकळीभान ते घोगरगाव या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रजिमा ६ या मोठ्या वाहतुकीच्या रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिकांनी आतिक्रमण केल्याने वाहतुक कोंडी व छोटेमोठे अपघात नित्याचा विषय झाला होता.

अतिक्रमण हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला उपोषणाची नोटीस वेळोवेळी देवुन आतिक्रमणे हटवण्याची मागणी केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन सर्व पुर्तता करुनही कारवाई होत नसल्याने १२ फेब्रुवारी रोजी पुन्हा उपोषण सुरु केले होते.

त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने गंभिर दखल घेत २३ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत पोलिस फौजफाट्यासह अतिक्रमण हटवण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. या कारवाईमुळे अतिक्रमण केलेले व्यापारीही भयभीत झाले आहेत. दुतर्फा ५० फुटाचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील आतिक्रमण हटवले जाणार आसल्याने अनेकांचे व्यवसाय मोडणार आहेत.

उपसरपंच खंडागळे व पटारे यांनी या प्रकरणात लक्ष घालुन उपोषणकर्ते शिंदे, व्यापारी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात समन्वय घालण्याची भुमिका घेतली.

त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे रस्त्याचा कोंडलेला श्वासही मोकळा होईल आणि व्यापाऱ्यांवरही विस्तापित होणार नाहीत, यादृष्टीने यशस्वी मध्यस्ती केल्याने व्यापाऱ्यांनी स्वत: दुकानापुढे आसलेले पत्र्याचे शेड काढुन घेण्यास सुरुवात केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News