हवामान विभागाने नगर जिल्ह्याला दिला पावसाचा ‘हा’ अलर्ट

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने याचा थेट आणि संपूर्ण परिणाम हा महाराष्ट्रावर होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील 2 ते 3 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत आहे.

दरम्यान, आज बुधवारीही नगर जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी देखील सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील काही तालुक्याची परिस्थिती आपण जाणून घेऊ….

शेवगाव : शेवगाव तालुक्यातील असंख्य भागात पावसाने काल मंगळवारी सकाळ पासून कमी अधिक प्रमाणात दिवसभर हजेरी लावली. बोधेगाव परिसरातील गोळेगाव, नागलवाडी, भागात जोरदारपणे अतिवृष्टीमुळे येथे काशी नदीला पूर आल्याने शेवगाव- गेवराई राज्यमार्ग बंद झाला आहे.

पाथर्डी : कोरडगाव ता पाथर्डी व शिंगोरी नदीला पूर आल्याने पाथर्डी-बोधेगाव वाहतूक बंद झाली आहे. नांदनी नदीला पूर आल्याने आखेगाव, भगूर, वरूर, शेवगाव, जोहरापूर भागात जनता हवालदिल झाली आहे

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहर व परिसरात या पावसामुळे शेतीपिकांना जीवदान मिळाले असलेतरी जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. शिर्डीत काल दुपारी जोरदार तर राहात्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत होता. कोपरगाव तालुक्यातही मध्यम पाऊस सुरू आहे.

संगमनेर : संगमनेर शहर व तालुक्यात प्रथमच सर्वदूर पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. अकोले तालुक्यातही कमी अधिक पाऊस सुरू आहे. नेवासा तालुक्यातही पावसाने काहीसा जोर धरला होता.

राहुरी : राहुरी शहर व तालुक्यात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाल्याचे दृष्य होते. सोमवारी रात्री पारनेर तालुक्यात दमदार पाऊस झाला. तर मंगळवारी दिवसभर नगर शहर आणि परिसरात पाऊसाच्या जोरदारर सरी राहुन राहून कोसळत होत्या.

पारनेर : पारनेरातील ढवळपुरी परिसरात अतिवृष्टी झाल्याने नदीला पूर आला. ढवळपुरी परिसरात अतिवृष्टी झाल्याने काळूनदीला पूर आला या पाण्यामुळे पूल वाहून गेला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe