अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण (वय ४९) यांचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यात घडली आहे. तसेच याप्रकरणाच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना झाली आहे.
मात्र अद्यापही पोलिसांना काही ठावठिकाणा लागलेला नाही आहे. यामुळे गावकऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ शनिवार दि. 6 मार्च रोजी कडकडीत गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापारी गौतम हिरण हे गेल्या सोमवारपासून बेपत्ता आहेत.

पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असला तरी अजूनही त्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरविण्यासाठी ग्रामस्थ व व्यापार्यांची ग्रामपंचायत कार्यालयात बैठक झाली.
गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेले व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरणा संदर्भात अचूक माहिती देणारास एक लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येईल.
असे जाहीर करण्यात आले. तसेच शनिवार दि. 6 मार्च रोजी या घटनेच्या निषेधार्थ गाव कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारपर्यंत अपहृत हिरण यांचा शोध लागला नाही तर, बेमुदत गाव बंद ठेवण्याचा निर्णयही एकमताने घेण्यात आला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|













