अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- काँग्रेस पक्षाचे या देशासाठी गेल्या १३६ वर्षापासून त्यागमय योगदान आहे. केंद्रात सत्तेवर असणारे भाजपचे सरकार हे सर्वच पातळ्यांवर निष्क्रिय ठरले असून देशात महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या,
देशाची उद्योगधंद्यात झालेली घसरण, पेट्रोल दर वाढ, डिझेल दरवाढ, विनाकारण केलेली नोटबंदी याच काळात झालेले मृत्यू यास केवळ मोदी सरकार जबाबदार असून चुकीचे धोरण देशात राबविले जात आहे.
यामुळे देशाचे अतोनात नुकसान होत आहे. यापुढील काळात राहुल गांधींना या देशाच्या प्रधानमंत्री पदी विराजमान करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन संकल्प करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कानडे यांनी केले.
खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच्या वतीने श्रीरामपुरात संकल्प दिन साजरा करण्यात आला. यावेळी इंद्रनाथ पाटील थोरात, बापूसाहेब सदाफळ, कार्लस साठे, विष्णुपंत खंडागळे,
ज्ञानेश्वर मुरकुटे, अभिजित लिपटे, सुनील शिरसाठ, प्रेमचंद कुंकुलोळ, भरत जगदाळे, सोन्याबापू शिंदे, राधाकिसन डांगे, राहुल जगताप, डॉ. राशिनकर, दत्तात्रय जाधव आदींसह काँग्रेस पदाधिकारी, सरपंच,
उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. कानडे म्हणाले, मोदी सरकारने देशाला कोरोनाच्या खाईत लोटले. याची पूर्वसूचना राहुल गांधींनी दिली होती.
येणाऱ्या काळात महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न यांचा बीमोड करण्यासाठी राहुल गांधी यांना देशाचे प्रधानमंत्री करण्याचा संकल्प घेण्याचे आवाहन कानडे यांनी केले.
प्रास्ताविक अॅड. समीर बागवान यांनी केले. बाबासाहेब कोळसे यांनी आभार मानले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम