अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- पुण्यातील भाजपच्या कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंदिर उभारलं होतं. पंतप्रधान कार्यालयाकडून कानपिचक्या मिळाल्यानंतर हे मंदिर हटविण्यात आले असल्याची सूत्रांकडून माहिती समोर येत आहे.
या मंदिरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा शेजारील नगरसेवकाच्या कार्यालयात हलविण्यात आला आहे. पुण्यातील औंध भागामधील मयूर मुंढे या भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतःची मालकी असलेल्या जागेत हे मंदिर उभारले होते.
पिंपरी चिंचवड येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांनी खास जयपूरमधून मोदींचा पुतळा तयार करुन घेतला आहे. याकरिता 1 लाख 60 हजार रुपये खर्च आलेला.
15 ऑगस्ट 2021 दिवशी या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले होते. मंदिरासमोर मयूर मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता मोदी भक्तांकरिता लावण्यात आली होती.
मंदिराबाहेर असलेल्या, फलकावर आतापर्यंत मोदींनी केलेल्या कामाचा उल्लेख देखील या कवितेच्या आधारे मांडण्यात आली होती. दरम्यान आता येथील मुर्तीच गायब झाली आहे.
यामुळे आता यापुढे आपल्या देशातील पुढील समस्या कोण दूर करणार? यापुढे पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ झाल्यावर आम्ही कोणाला साकडे घालायचे? यापुढे आमच्या नवसाला कोण पावणार? अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीने भाजपला उपहासात्मक सवाल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम