मान्सूनचे लवकर होणार आगमन, असा आहे हवामान खात्याचा अंदाज…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- देशातील बर्‍याच भागांमध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस झाला. अजूनही काही भागांमध्ये पाऊस सुुरु आहे. अशात नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून निश्‍चित तारखेच्या एक-दोन दिवस आधी केरळमध्ये दाखल होणार आहे.

तसेच यंदा मान्सूनचा पाऊसही चांगला असण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याचे महासंचालक डॉ. एम. महापात्रा यांच्या मते, चक्रीवादळ आणि दक्षिण-पश्चिम मान्सूनमध्ये सुमारे दोन आठवडे अंतर आहे.

यानुसार, येत्या तीन ते चार दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे तर त्यानंतर केरळमार्गे प्रवास करत ८ जूनपर्यंत कोकणात पावसाचे आगमन होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.पावसाळ्याच्या आगमनाची पूर्व निर्धारित तारीख १ जून आहे.

तो३१ मेपर्यंत केरळमध्ये पोचेल असा अंदाज आहे. भारतीय मान्सून प्रदेशात मान्सूनचा पाऊस दक्षिण अंदमानच्या समुद्रापासून सुरू होतो आणि मान्सूनचे वारे वायव्येकडून बंगालच्या उपसागराकडे जातात.

अरबी समुद्रावर चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेता २० मेपासून बंगालच्या उपसागरावर मान्सून खूप जोरदार होईल. २१ मे रोजी, मान्सून दक्षिण बंगालची उपसागर आणि अंदमान निकोबार बेटांना व्यापेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

मान्सूनच्या बदललेल्या चक्रानुसार आता अंदमानच्या समुद्रामध्ये मान्सून २२ मेपर्यंत दाखल होऊ शकतो. चक्रीवादळाच्या स्थितीमुळे सध्या अरबी समुद्रावरील वारे अधिक तीव्र झाले आहेत. २० मेच्या सुमारास बंगालच्या उपसागरावरील वारे तीव्र होतील.

त्यानंतर २१ मे रोजी बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग, अंदमान, निकोबार येथे सातत्यपूर्ण पाऊस पडेल. त्यामुळे २१ मे रोजी मान्सून या भागात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News