अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी सर्वात महत्वाची बातमी ! आजपासून कामकाज होणार ठप्प: शहरात पहिल्याच दिवशी साचले कचऱ्याचे ढीग

Ahmednagar City News : अहमदनगर अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्याचे विविध प्रश्न प्रलंबित असून राज्य शासनाकडे सातवा वेतन आयोग व लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्क नोकरी मिळावी यासाठी अहमदनगर मनपा कर्मचारी संघटनेच्या वतीने नगर ते मुंबई मंत्रालय असा लाँग मार्च मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चामध्ये हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे. जोपर्यंत कर्मचाऱ्यांचे दोन्ही प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आमची माघार नाही.

हा मोर्चा १७ ऑक्टोबर रोजी मुंबई मंत्रालयावर धडकणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा, आरोग्य, पाणीपुरवठा वर गेट वगळून पालिकेचे सर्व कामकाज ठप्प राहणार आहे. त्यामुळे सोमवारी (दि.२) शहरामध्ये सकाळी साफसफाईचे काम न झाल्यामुळे सर्व कचऱ्याचे ढिग पहावयास मिळत आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील अडीच लाख कर्मचारी वारस हक्क नोकरीपासून वंचित असून लाड समितीच्या शिफारशीनुसार तात्काळ वार हायकर्मण्यिता अशी मागणी मनपा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आनंद लोखंडे यांनी केली गावेळी आनंद बादकर, बाबासाहेब मुल महादेव कोतकर, गुलाब गाडे, राहुल, विठ्ठल उमाप यांच्यासह मनपा कर्मचारी उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने ठेकेदारामार्फत साफसफाई कर्मचारी नेमले असून त्यांची संख्या मात्र खूपच कमी आहे. त्यामुळे नगर शहराची साफसफाई करण्यात मोठी अडचण येत आहे.

परिणामी शहरात चाचे साम्राज्य पसरल्याचे पाहायला मिळत आहे. महानगरपालिका कर्मचान्यांचे हे आंदोलन १७ दिवस चालू राहणार असून आता तोपर्यंत शहरात नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe