नगरपरिषदेने भल्या पहाटे वर्षानुवर्षे असलेली अतिक्रमण जमिनदोस्त केली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- शहर असो वा गाव सगळीकडे एक गोष्ट आवर्जून दिसून येत ती म्हणजे मोकळी जागा दिसली कि त्या ठिकाणी अतिक्रमण करायचे…

मात्र जेव्हा प्रशासनाकडून कारवाईच बडगा उगारण्यात येतो तेव्हा मोठं मोठी अतिक्रमण जमीनदोस्त होत असतात. असाच काहीसा प्रकार राहाता शहरात झालेला पाहायला मिळाला आहे. राहता शहरात चितळी रोड लगत अनेक नागरिकांनी नगरपरिषदेच्या शासकीय जागेवर अतिक्रमण केले होते.

शहरातील अनेक नागरिकांनी याबाबत नगरपरिषदेकडे वारंवार तक्रारी सुध्दा केलेल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत नगरपरिषदेचे नव्याने हजर झालेले मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी अनधिकृतरित्या केलेले अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम राबवली आहे.

चितळी रोड लगत असणारे साधारण 20 वर्षांपासूनचे अतिक्रमण नगरपरिषदेने जमिनदोस्त केले. भल्या पहाटे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण जेसीबी आणि ट्रॅक्टर, पालिका कर्मचार्‍यांच्या फौजफाट्यासह अतिक्रमण स्थळी दाखल झाले.

अतिक्रमण केलेल्या रहिवाशी आणि व्यावसायिकांना या कारवाईबद्दल पूर्व कल्पना नसल्याने त्यांची चांगलीच धावपळ उडाली. साधारण 15 ते 20 वर्षांपूर्वी पासूनची आपली दुकाने तोडली जात असल्याने व्यावसायिकांचा नक्कीच संताप झाला होता.

मात्र पालिकेच्या कारवाईपुढे त्यांचा नाईलाज झाला. अतिक्रमण काढण्यास आमची हरकत नसून, आम्हाला पूर्व कल्पना द्यायला हवी होती अशी प्रतिक्रिया अतिक्रमणधारकांची होती. या कारवाईदरम्यान काही काळ मुख्याधिकारी आणि अतिक्रमणधारक यांच्यात शाब्दिक बाचाबाची देखील झाली.

ते मुख्याधिकारी असल्याचे समजताच संबंधितांनी शांत राहणेच पसंत केले. चंद्रकांत चव्हाण यांनी राहाता पालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा चार्ज घेतल्यानंतर शहरातील अतिक्रमणांविरोधात त्यांची पहिलीच मोठी आणि धडक कारवाई होती. या कारवाईची राहाता शहरात चांगलीच चर्चा रंगली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe