अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- नेवासे तालुक्यातील वरखेड येथील सोहम खिलारे या आठ वर्षीय मुलाची दगडाने डोके ठेचून हत्याप्रकरणाने वेगळे वळण घेतले. आईनेच मुलाचा खून केल्याचा संशय बळावला. सोहम खिलारे हत्याप्रकरणी त्याची आई सीमाला अटक केली.
यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असून त्या दिशेने तपास चालू आहे. पोलिसांना चोवीस तासात मुख्य खुन्याचा तपास लावण्यात यश आले. जन्मदात्या आईनेच आपल्या मुलाची हत्या केल्याचा पोलिसांचा संशय बळावला.

पोलिसांनी त्या मुलाच्या आईला अटक केली. सुरुवातीला घटना घडल्यापासून पोलिसासह ग्रामस्थांना या निर्घृण हत्येबाबत त्याच्या सावत्र बापावर संशय होता. मात्र, आईच्या नाटकी कृत्यामुळेच ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली.
प्रारंभी मुलाचा मृतदेह पाहून नाटकी टाहो फोडणाऱ्या आईने तपासादरम्यान पोलिसांची दिशाभूल केली. तिने अनेकांवर संशय घेतले. पोलिसांनी संबंधित संशयितांना ताब्यात घेतले. मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नाही.
दरम्यान, तपासात मिनिटा-मिनिटांना दिशाभूल करणारी माहिती ती पोलिसांना देत असल्याने पोलिसांचा तिच्यावरचा संशय बळावला आणि तिने रचलेल्या कुभांडामुळे ती पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकली.
सोहमची हत्या त्याची आई सीमा उत्तम खिलारे (वय ३२, रा. वरखेड, ता. नेवासे) हिनेच केल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, नेवासे पोलिसांनी सीमाला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली असल्याचे पोलिस निरीक्षक विजय करे यांनी सांगितले.
सायंकाळी सात वाजता मृत सोहमने आईला लसून सोडून दिला. त्यानंतर तो घरापासून जवळ अंधारात कशाला गेला. त्यावेळी त्याचे बरोबर कोण होते.
या प्रश्नाबरोबरच सदरच्या हत्याकांडाची कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे कृत्य करण्यात किती जण सहभागी होते, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम