राष्ट्रवादीच्या पाठपुराव्याला यश भिंगारला जोडणार्‍या रस्त्यांच्या दुरुस्तीची केली होती मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- भिंगार येथील अंडर एमईएस छावणी परिषदेचे ब्रिगेडियर यांच्या माध्यमाने कॅन्टोन्मेंट हद्दीतील भुईकोट किल्ला समोरील डिएसपी चौकाकडे जाणार्‍या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले असून, त्याचे डांबरीकरण सुरु आहे.

भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीला यश आले असून, या कामाची भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी पहाणी केली. यावेळी रमेश वराडे, दिपक बडदे, राष्ट्रवादी युवकचे शहर उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, संपत बेरड, मेजर दिलीप ठोकळ, मच्छिंद्र बेरड आदी उपस्थित होते.

भिंगारच्या विविध नागरी प्रश्‍नासह खराब झालेल्या एमईएस छावणी परिषद अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण होण्यासाठी भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर विजयसिंग राणा यांची भेट घेऊन चर्चा केली होती.

राणा यांनी सदर निवेदनाची दखल घेत प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले होते. लॉकडाऊननंतर टप्प्याटप्प्याने रस्त्यांचे कामकाम मार्गी लावले जात असून, नुकतेच भुईकोट किल्ला समोरील डिएसपी चौकाकडे जाणार्‍या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून भिंगार येथील अनेक प्रश्‍न मार्गी लावण्यात आले आहे. येथील प्रश्‍न सोडविण्यास राष्ट्रवादी नेहमी कटिबध्द राहणार आहे. भिंगार छावणी मंडळ परिसरातील नागरिक क्षेत्रासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करणे,

भिंगार छावणी मंडळ हॉस्पिटल येथे डॉक्टर व कर्मचारी वाढवणे, केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ येथील नागरिकांना मिळण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.

हे प्रश्‍न देखील राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुटणार असल्याची भावना संजय सपकाळ यांनी व्यक्त केली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe