अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-राज्यासह नगर जिल्ह्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव होत आहे. जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने बाधितांची भर पडते आहे.
यामुळे आरोग्य विभागावर ताण पडतो आहे. यातच कोरोनाची साखळी तोडायची असेल तर जिल्ह्यात जास्तीत जास्त कोविड सेंटर गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजीमंत्री शिवाजी कर्डिले यांनी केले आहे.
नगर तालुक्यातील वांळुज येथील रामसत्य लॉन येथे कै. दादा पाटील शेळके कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शंभर बेडचे कोवीड आयसोलेशन सेंटर सुरु करण्यात आले. यावेळी कर्डिले बोलत होते.
या सेंटरचे उद्घाटन माजी मंत्री बबनराव पाचपुते, आ.संग्राम जगताप, सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान यावेळी बोलताना कर्डिले म्हणाले कि, नगर तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत चालली आहे.
ऑक्सीजन तसेच इंजेक्शन मिळत नसल्यामुळे नागरिक घरीच उपचार घेत आहे. यामुळे त्याचा स्कोर ही वाढत चालला आहे. रुग्णाच्या संसर्गमुळे घरातील लोकाना तसेच परीसरात ही रुग्ण संख्या वाढत आहे.
शहरातील रुग्णालये ग्रामीण भागातील रूग्णा ना उपचार घेण्यासाठी परवडत नाही. या रुग्णांची सोय व्हावी या हेतुने बाजार समितीच्या वतीने कोवीड सेंटर सुरू केले.
या सेंटरच्या माध्यमातुन नगर तालुक्यातील रूग्णांना सर्व सुविधा मोफत उपलब्ध करुन देणार आहोत. शहरात बेड उपलब्ध होत नसल्यामुळे शंभर बेडची व्यवस्था केली. अजून 2 दिवसात 100 बेड असे 200 बेड उपलब्ध करुन देणार आहोत..
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|