गरजूंना धान्य मिळालेले नाही.सामान्य माणसाची उपासमार सुरूच आहे

नगर Live24 टीम, 2 मे 2021 :- राज्य सरकारने दुसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केली.मात्र पहिल्या लॉकडाऊनच्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांची किती अंमलबजावणी मंत्री आणि विभागाकडून झाली? असा सवाल भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

आ.विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यात दुसऱ्या लॉकडाऊनवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांच्या मागील घोषणे नंतरही गरजूंना धान्य मिळालेले नाही.सामान्य माणसाची उपासमार सुरूच आहे.

किमान झालेल्या घोषणांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.लसीकरणासाठी पंतप्रधानानी पुढाकार घेतला.पण केंद्र सरकारचा लसीकरणात दुजाभाव हा महाविकास आघाडी सरकार मधील मंत्र्यांचा आरोप आश्चर्यकारक वाटतो.

एकीकडे राज्यात सर्वाधिक लसीकरण झाले म्हणून सरकार पाठ थोपटून घेतय, मग केंद्राच्या सहकार्याशिवाय हे लसीकरण झाले का? आपण काय बोलतोय याचे भान आघाडीच्या मंत्र्यांनी ठेवायला हवे.

एक मे पासून लसीकरणासाठी सर्वच राज्यांनी पुढाकार घेतला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना लिहीले पत्र म्हणजे स्वत:ची अब्रू झाकण्याचा प्रकार आहे.

एक वर्षापासून कोविड संकट आहे. महसूल मंत्र्यांना सुविधांचा अभाव असल्याच आज कळाल का? फक्त फार्स करायचा आणि स्वत:चे अपयश झाकण्यासाठीचा हा पत्रव्यवहार आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|