श्रीरामपुरात सक्रिय रुग्णांची संख्या दीड हजारांच्या पार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा वेग काहीसा मंदावला आहे. तरीही मात्र दरदिवशी हजारोंच्या संख्यने बाधितांची भर पडते आहे. यातच या विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव जिल्ह्यातील उत्तरेकडील भागामध्ये दिसून येत आहे.

यातच सध्या स्थितीला श्रीरामपूर तालुक्यात सक्रिय रुग्णांची संख्या दीड हजारांच्या पार गेली आहे. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या 24 तासात 391 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

शनिवारी 1534 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या काल 226 होती.

जिल्हा रुग्णालयात 05 खासगी रुग्णालयात 315 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 71 असे रुग्ण आढळून आले आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 12290 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 10637 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News