अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- गेल्या एक महिन्यापासून जिल्ह्यातील इतर तालुके व नगर शहराच्या तुलनेत तालुक्यातील करोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे.इतर तालुक्यात रुग्ण संख्या कमी होत असताना तालुक्यात मात्र दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे.
जिल्हा आणि तालुका प्रशासनाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. कोरोना संसर्गाच्या फैलावाचे कारण शोधण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तालुक्यात जनुकीय क्रमवारी (जिनोम सिक्वेंसिंग) निश्चित करण्याचे आदेश दोन दिवसांपूर्वी दिले आहेत.
करोना संसर्गाचा वेगाने होणारा फैलाव रोखण्यासाठी निघोज व परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषीत करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी निघोज येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
ग्रामस्थांशी चर्चा केली. उपविभागीय दंडाधिकारीधिकारी सुधाकर भोसले त्यांच्या समवेत होते. कोरोना संसर्गाचा वेगाने फैलाव होत असलेल्या तालुक्यातील अकरा गावांमध्ये करोना प्रतिबंधक उपाययोजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक गावासाठी स्वतंत्र पालक अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याच बरोबर या गावांमध्ये आरोग्य अधिकारी,आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका,ग्रामसेवक, तलाठी,शिक्षकांचा समावेश असणारी पथके नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली.
या पथकांबरोबर प्रत्येक गावात चार पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.करोना संसर्गाचा वेगाने होणारा फैलाव रोखण्यासाठी निघोज व परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषीत करण्यात आला आहे.
शुक्रवारी सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी निघोज येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ग्रामस्थांशी चर्चा केली. उपविभागीय दंडाधिकारीधिकारी सुधाकर भोसले त्यांच्या समवेत होते.
कोरोना संसर्गाचा वेगाने फैलाव होत असलेल्या तालुक्यातील अकरा गावांमध्ये करोना प्रतिबंधक उपाययोजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक गावासाठी स्वतंत्र पालक अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याच बरोबर या गावांमध्ये आरोग्य अधिकारी,आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका,ग्रामसेवक, तलाठी,शिक्षकांचा समावेश असणारी पथके नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली. या पथकांबरोबर प्रत्येक गावात चार पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम