अहमदनगर जिल्ह्यातील तो ऑक्सिजन प्लान्ट किमान चार महिने उभारता येणार नाही !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाची परिस्थिती भयावह झाली आहे. यातच जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होतो आहे.

यासाठी जिल्ह्यात काही ठिकाणी ऑक्सिजन प्लान्टचे काम सुरु आहे. मात्र ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीमुळे कोपरगाव शहरात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.

कोपरगाव शहरात लोकसहभागातून एक ऑक्सिजन प्लान्ट ग्रामीण रुग्णालयात बसविण्याबाबत चर्चा करण्यासाठी सभा नुकतीच नगरपरिषदेत पार पडली होती.

50 ते 60 लाख रू. गुंतवणूक करून ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यासाठी आर्थिक भार उचलण्याचे अनेकांनी मान्यही केले.

पण त्यानंतर अनेक राज्यातील ऑक्सिजन प्लान्ट निर्मिती करणार्‍या कंपन्यांशी संपर्क केला.मात्र अजून किमान चार महिने तरी ऑक्सिजन प्लान्ट उभारून देता येणार नाही.

कारण सर्व देशभरातूनच अशा प्लान्टला प्रचंड मागणी आहे असेच सांगण्यात आले, अशी माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe