उभी असलेली कार थेट जमिनीत गेली, व्हिडीओ पाहून बसेल धक्का…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- मुंबई आर्थिक राजधानी असली तरी राहण्यासाठी खूपच धोकादायक असे शहर आहे, असे अनेकजण म्हणतात. त्याचीच प्रचिती मुंबईकरांना पुन्हा एकदा आली आहे.

थोडाजरी पाऊस झाला की मुंबईची तुंबई कशी होते हे सांगणारा एक थरारक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हीडीओमध्ये घरासमोर पार्क करण्यात आलेली एक कार चक्क खड्ड्यात गायब झाली आहे. ही कार अवघ्या काही सेकंदात पाण्यात बुडाली असून घाटकोपर परिसरातील ही घटना आहे.

गेल्या चार दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबईत दादर, सायन, माटुंगा, लोअर परेल, मरिन ड्राईव्ह यासारख्या भागात पावसाची रिपरिप सुरु आहे.

या पावसामुळे येथील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा मुंबईच्या घाटकोपर परिसरातील आहे. येथे एका घरासमोर कार पार्क केलेली दिसतेय. मात्र मुसळधार पावसामुळे या भागात बरेच पाणी साचले आहे.

पाणी साचल्यामुळे घाटकोपरचा हा भाग भुसभुशीत झाला आहे. कारच्या समोर असलेल्या जमिनीवर खड्डा पडल्यामुळे या खड्ड्यामध्येही चक्क पाणी जमा झाले आहे. याच खड्ड्यात एक कार पडताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe